‘स्व’ची जाणीव – DISCOVER YOURSELF

 

आज आपण एका अशा विषयावरती बोलू जो प्रत्येकाशी निगडित आहे. आपण काही वेळा ऐकतो कि, एखाद्याच्या मनावरती प्रचंड मोठ्ठा आघात होतो आणि तो त्यामधून पेटून उठतो व काहीतरी भव्य करून जातो. विराट कोहलीचेच उदाहरण घ्या. त्याचे वडील मृत्यू पावले आणि त्याच्या खेळामध्ये आमूलाग्र बदल झाला. आपण सगळे त्याला रन मशीन म्हणून ओळखू लागलो. काही दिवसापूर्वीच त्याला भारताचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
असे काहीतरी होण्यासाठी कोणाचा मृत्यू कारणीभूत ठरतो असे नाही. काही वेळा कोणाचे तरी बोलणे, प्रिय व्यक्तीचे दूर जाणे, इ. गोष्टी कारणीभूत ठरतात. मनावरती खोल जखम होऊन जाते. हा आघात आपल्यासाठी फार महत्वाचा असतो. काही जण यामध्ये सावरून जातात तर काही मोडकळून जातात. प्रत्येकाची विचार सारणी, स्वभाव, संगत, संस्कार यामध्ये महत्वाचे ठरतात.
चिनी technique jeet kune do, kung fu या महान गोष्टी मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे कि ‘जोपर्यंत तुम्हाला तुमच्या “स्व”ची जाणीव होत नाही तोपर्यंत तुम्ही आपले ध्येय साध्य करू शकत नाही.’ आणि असा आघात जेव्हा तुमच्या मनावरती होतो ना तेव्हा “स्व”ची जाणीव होण्याचा सुवर्ण काळ असतो असे मला वाटते. नीतीन बानूगडे-पाटील सरांच्या एका भाषणात मी ऐकले होते. एक ६५ वर्षाची आजी स्वतःच्या पतीचे operation करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून बारामती मध्ये एका मॅरेथॉन मध्ये धावली. Athletics नावाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ती स्त्री धावली. पायात चप्पल, बूट असे काही नसताना तसेच कसलेले स्पर्धक सोबत असताना ती धावली आणि जिंकली सुद्धा. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी या स्त्री ची कहाणी आहे.
हे ती का करू शकली? कारण तिला समोर फक्त दिसत होता तो तिचा पती आणि त्याचा जीव. यातून ती पेटून उठली आणि हे कथानक घडले. सांगायचा उद्देश हाच आहे कि, जीवनात जेव्हा तुम्हाला ‘प्रगल्भता’ या शब्दाचा अर्थ समजेल तेव्हापासून स्वतःला शोधण्याच्या मागे लागा. आरशात जेव्हा आपण स्वतःला पाहतो तेव्हा नटणे-सवरणे थोडे बाजूला ठेवून स्वतःच्या नजरेत स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. रोज स्वतःसाठी वेळ द्या. आठवड्यातून एकदा कुठेतरी अशा ठिकाणी जाऊन बसा ज्याठिकाणी तुम्हाला कोणी disturb करणार नाही. वाचनालय यासाठी अतिशय योग्य. मोठ्या थोर लोकांची चरित्रे वाचा. आपण लहानपणा पासून ऐकत आलो आहोत कि पुस्तके आपली खूप chan friends आहेत कारण ती आपल्याला कधीच सोडून जात नाहीत. तसेच आपल्याला आवडत्या व्यक्तींना वेळ द्या. आवडत्या friends सोबत रहा. आणि हो, सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘जगाचा विचार करू नका. कोणतेही पाऊल टाकताना धाडसाने टाका. विचार करू नका कि लोक काय म्हणतील.’ कारण लोक तुम्हाला चुकीचं कधी ठरवता ठाऊक आहे का? तेव्हा नाही जेव्हा तुम्ही चुकीचे असता, तर तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्या मनासारखे नाही वागता. so तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा. लोक काय बोलतील याचा विचार करू नका. हा, पण कोणतेही काम करताना एक thing करा. पुढील questions ची answer स्वतःला विचारा.
1) मी हे जे काम करतो ते माझ्यासाठी योग्य आहे का?
2) मी हे जे काम करतो ते माझ्या आई-वडिलांना कसे वाटेल?
3) मी हे जे काम करतो ते माझ्या देशासाठी योग्य आहे का?
life मध्ये तुम्हाला हवे तसे जगा, मनात येईल तेव्हा खळखळून हसा, काही वाईट वाटले तर रडून मोकळे व्हा, वयाने कितीही मोठे असाल तरी मनाचे बालपण व निरागसता कायम जपून ठेवा. आणि ‘स्व’चा शोध कायम ठेवा.
धन्यवाद…….
लेखक- अपरिचित..

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s